अजित नवले यांना जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:39 IST2021-02-05T06:39:14+5:302021-02-05T06:39:14+5:30

नवले यांच्याबाबत गुरुवारी एका व्यक्तीने फेसबुकवर ‘नीट राहा, नाही तर गोळ्या घालीन’ अशी पोस्ट टाकली. ही पोस्ट इतर दोघांनी ...

Threat to kill Ajit Navale | अजित नवले यांना जिवे मारण्याची धमकी

अजित नवले यांना जिवे मारण्याची धमकी

नवले यांच्याबाबत गुरुवारी एका व्यक्तीने फेसबुकवर ‘नीट राहा, नाही तर गोळ्या घालीन’ अशी पोस्ट टाकली. ही पोस्ट इतर दोघांनी लाइक केली. या धमकीबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. नरसय्या आडम यांनी सांगितले की, सध्या देशभर केंद्र सरकारविरुद्ध देशव्यापी शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दडपून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या कुटिल कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर धमकीची ही पोस्ट टाकण्यात आली आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांचा हौतात्म्य दिन आहे. त्यांचा खून करणाऱ्या शक्तीच आज अशा धमक्या देत आहेत. फेसबुकवरून अशा धमक्या देणाऱ्या व त्या लाइक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तातडीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आडम यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.

..........................

फेसबुकच्या माध्यमातून आलेल्या धमकीबाबत पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दिलेली नाही. याबाबत पोलिसांना तोंडी माहिती दिली आहे. अशा धमक्यांना भिऊन चालणार नाही. विवेकी विचार घेऊन शेतकरी प्रश्नांसाठीचा लढा चालू राहील.

-डॉ. अजित नवले, शेतकरी नेते

Web Title: Threat to kill Ajit Navale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.