अण्णांच्या अभियानात तीन हजार युवक -------------

By Admin | Updated: February 19, 2015 13:12 IST2015-02-18T23:54:12+5:302015-02-19T13:12:00+5:30

पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनात व युवक जागृती अभियानात सुमारे तीन हजार युवक सहभागी होणार आहेत़

Thousands of youths in Anna's campaign ------------- | अण्णांच्या अभियानात तीन हजार युवक -------------

अण्णांच्या अभियानात तीन हजार युवक -------------

पारनेर (जि. अहमदनगर) : शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनात व युवक जागृती अभियानात सुमारे तीन हजार युवक सहभागी होणार आहेत़
पारनेर तालुक्यासह जिल्हाभरात संघर्ष मंचच्या माध्यमातून ही युवा टीम अण्णांच्या आंदोलनात सक्रिय होणार आहे़ अण्णा हजारे यांनी २३ व २४ फेबु्रवारीला आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. युवकांनी भरलेले सुमारे तीन हजार अर्ज बुधवारी काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल झावरे यांच्या हस्ते अण्णांकडे सुपूर्द केल्याचे मंचचे प्रा. हरीष शेळके यांनी सांगितले. अण्णा दिल्लीत आंदोलन करतील, तेव्हा पारनेर तहसील कार्यालयावर युवक धरणे आंदोलन करणार आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of youths in Anna's campaign -------------

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.