५० हजार मोबाईलची नेवासा शहरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 17:28 IST2017-12-23T17:27:03+5:302017-12-23T17:28:12+5:30
रस्त्यात भांडणाचे नाटक करून मोबाईल दुकानदाराने घरी चालविलेले ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी पळविले. नेवासा शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

५० हजार मोबाईलची नेवासा शहरात चोरी
नेवासा : रस्त्यात भांडणाचे नाटक करून मोबाईल दुकानदाराने घरी चालविलेले ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी पळविले. नेवासा शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
शरद उगले यांची शहरात श्री साई ट्रेडर्स व मोबाईल शॉपी आहे. शुक्रवारी आठ वाजता दुकान बंद करुन घरी जात असताना राधाकृष्ण मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर दोन तरुण भांडत होते. भांडणाचा जाण्यास अडथळा आला म्हणून उगले यांनी दुचाकीचा वेग कमी केला. एका चोरट्याने उगले यांच्याकडील नवीन मोबाईल असलेली पिशवी घेऊन नेवासा शहरातील मुख्य रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली. तर दुसरा दुचाकीवरुन नेवासा बाजार समितीच्या दिशेने पसार झाला. उगले यांनी बाजार समितीपर्यंत या चोरट्याचा पाठलाग केला.
पिशवीत ५० हजार रुपये किंमतीचे एकूण ३० हॅण्डसेट होते. याबाबत शरद उगले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वाढत्या चोºयांमुळे मोबाईल विक्रेते रोज रात्री मोबाईल घरी नेतात. त्यामुळे चोरटे नवीन शक्कल लढवित असल्याचे उगले यांच्या चोरीवरून स्पष्ट होते. दर रविवारी बाजारातही मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीस जात असल्याच्या तक्रारी आहेत.