अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या हजारी पार; आज नवे आठ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 14:22 IST2020-07-19T14:22:16+5:302020-07-19T14:22:55+5:30
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी (१९ जुलै) १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये सकाळी ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले.

अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेली रुग्ण संख्या हजारी पार; आज नवे आठ रुग्ण आढळले
अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी (१९ जुलै) १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये सकाळी ८ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एक रुग्ण तर श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव १, कोळगाव १, अजनुज १, देवदैठण १ आणि घारगाव येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.
रविवारी सकाळी ७५ रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज बाधित आढळलेल्या रुग्णासह उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ५१६ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी सांगितले.