दातेंचे राष्ट्रवादी सोडण्याचे सूतोवाच
By Admin | Updated: October 2, 2014 00:34 IST2014-10-02T00:31:56+5:302014-10-02T00:34:29+5:30
पारनेर : राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झावरे यांना आमदार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ पण त्यांनीच माझे खच्चीकरण केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ दाते यांनी केला.

दातेंचे राष्ट्रवादी सोडण्याचे सूतोवाच
पारनेर : राष्ट्रवादीचे नेते वसंतराव झावरे यांना आमदार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली़ पण त्यांनीच माझे खच्चीकरण केले, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ दाते यांनी केला. पक्षाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा नाही, असे सांगत विधानसभा निवडणुकीत थेट पक्षाविरोधी दंड थोपटण्याची भूमिका दाते यांनी जाहीर करुन पक्ष सोडण्याचे सूतोवाच केले़ मात्र, थेट भूमिका जाहीर न करता पाच दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले़
पारनेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पारनेर येथे काशिनाथ दाते यांच्या समर्थकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर, वसंतराव झावरे, आ़ विजय औटी, उमेदवार सुजित झावरे यांच्यावर जोरदार टीका केली. दाते म्हणाले, मी सामान्य कुटुंबातून आलो़ पारनेर कारखाना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये प्रामाणिकपणे काम केले. सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीकडे मागितली होती़ पण पक्षाने उमेदवारी दिली नाही. पुढील निर्णय पाच दिवसात जाहीर करु असे सांगत दाते यांनी राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले़ यावेळी वसंत चेडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)