‘त्या’ १६ शिक्षकांवर चालू आठवडाभरात कारवाई
By Admin | Updated: May 13, 2014 01:18 IST2014-05-13T00:54:48+5:302014-05-13T01:18:34+5:30
अहमदनगर : ७६ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांवर चालू आठवड्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

‘त्या’ १६ शिक्षकांवर चालू आठवडाभरात कारवाई
अहमदनगर : दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात बदली टाळण्यासाठी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करण्यार्या ७६ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांवर चालू आठवड्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. या बनावट ७६ अपंग शिक्षकांपैकी १६ शिक्षकांची चौकशी पूर्ण झाली असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यांवर कारवाई करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली. मात्र, या प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागात कमालीची गुप्तता पार पाडण्यात येत आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून कारवाईची गेल्या आठवड्यात कारवाईची फाईल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. ते अभ्यास करून जिल्हा परिषद अधिनियम शिस्त आणि अपीलनुसार करवाई करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित ६० शिक्षकांची विभागीय आयुक्त कार्यालयात चौकशी पूर्णत्वाकडे आहे. त्या शिक्षकांवर कारवाईची शिफारस लवकर जिल्हा परिषदेलाकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)