कोपरगाव तालुक्यातील पुणतांबामध्ये ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:04 IST2018-11-17T15:36:45+5:302018-11-17T16:04:45+5:30
कोपरगाव तालुका दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी साठवलेले पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने सोडण्याचा निर्णय घेतला.

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबामध्ये ठिय्या आंदोलन
वारी : कोपरगाव तालुका दुष्काळाचा सामना करत असताना पिण्याच्या पाण्यासाठी साठवलेले पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात नदी काठावरचे शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठिय्या आंदोलन केले.
कायम स्वरुपी बंधा-याला दरवर्षी हक्काचे पाणी मिळावे. सुरुवातीला पुणतांबा जेवढे पाणी द्यावे. फळ्या जेसिपीने न काढता माणसाने हाताने काढाव्यात. जेणेकरून फळ्याची तोडफोड होणार नाही. या मागण्यासाठी दोन दिवसापासून पाणी सोडू नये, यासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, शेतकरी पुणतांबा बंधा-याकाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठिय्या आंदोलन केले होते. यांच्या मागण्या मान्य करून कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील केटी बंधा-यातील जायकवाडी साठी पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले . यावेळी उपस्थित खासदार सदाशिव लोखंड, सरपंच धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुधाकर जाधव, जालिंदर इंगळे, रावसाहेब टेके, अशोक बोर्डे, नवनाथ जाधव, रामेश्वर जाधव उपस्थित होते.