राहुरीत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 16:55 IST2018-02-23T16:54:32+5:302018-02-23T16:55:35+5:30
भागडा पाईप चारीचे वीज कनेक्शन त्वरीत जोडून द्यावे, या मागणीसाठी महावितरणच्या राहुरी कार्यालयासमोर शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले. थकीत बाकी भरूनही वीज कनेक्शन का जोडून दिले जात नाही, असा सवाल विचारीत शेतक-यांनी अधिका-यांना धारेवर धरले.

राहुरीत महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
राहुरी : भागडा पाईप चारीचे वीज कनेक्शन त्वरीत जोडून द्यावे, या मागणीसाठी महावितरणच्याराहुरी कार्यालयासमोर शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केले. थकीत बाकी भरूनही वीज कनेक्शन का जोडून दिले जात नाही, असा सवाल विचारीत शेतक-यांनी अधिका-यांना धारेवर धरले.
नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे व शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज कनेक्शन जोडून देण्याची मागणी केली. विजेची थकबाकी नसताना कुणाच्या दबावाखाली वीज जोडून देण्यास विलंब केला जातो, असा सवाल नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला. आजच विजेचे कनेक्शन जोडून देण्यात यावे, अशी मागणी रावसाहेब खेवरे यांनी केली.
भागडा पाईप चारीची थकीत आठ लाख रूपयांची रक्कम भरण्यात आली आहे. रोटेशन केवळ दहा दिवस बाकी आहे. पाईप चारीव्दारे तलाव भरण्यास विलंब झाल्याने शेतक-यांचे नुकसान झाले असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
महावितरणचे उपअभियंता धिरज गायकवाड यांनी लवकरच वीज जोडणी केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी उपसरपंच विजय नरवडे, सुयोग नालकर, भाऊसाहेब आडभाई, सुधीर झांबरे, अनिल घाडगे, जयसिंग घाडगे आदी उपस्थित होते.