तीस वर्षांच्या आठवणींना मिळाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:16+5:302021-01-08T05:06:16+5:30
कळसेश्वर विद्यालय कळसच्या १९९१ च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थांनी दिला. कळस बुद्रूक येथील कळसेश्वर विद्यालयात १९८८ ते १९९१ या चार ...

तीस वर्षांच्या आठवणींना मिळाला उजाळा
कळसेश्वर विद्यालय कळसच्या १९९१ च्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थांनी दिला. कळस बुद्रूक येथील कळसेश्वर विद्यालयात १९८८ ते १९९१ या चार वर्षात शिकलेले व १९९१ साली दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले होते. जवळपास ३० वर्षांनंतर एकत्र भेटले.
यावेळी कळसेश्वर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले देवराम वाकचौरे व शिवाजी बिबवे, प्राचार्य रावसाहेब कोटकर यांचा विद्यार्थांनी सन्मान केला. भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, रोटरी क्लब जुन्नरच्या अध्यक्षपदी अंबादास वामन, मुख्याध्यापिका अर्चना आंबरे कासार, मुकेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक कैलास वाकचौरे व आभार अर्जुन भुसारी यांनी मानले. मधुकर ढगे, राजेंद्र नवले, मालती गोसावी, मीरा वाकचौरे-लांडगे, मनीषा भुसारी जाधव, सुलताना सय्यद, अलका डगळे उंबरे आदींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.