शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामासाठी तेराशे कोटींचा निधी : राम शिंदे यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 16:33 IST

३५ वर्षापासून रखडलेल्या कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामाचा प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली.

ठळक मुद्दे कर्जत-जामखेडमधील बंधा-यासाठी ४ कोटी ८२ लाख निधीची कामे झाली आहेत.यंदा जलयुक्त शिवाराची १ कोटी ७० लाख निधींची कामे प्रस्तावित आहेत.कुकडीच्या सिंचन चा-यांसाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी

राशीन : ३५ वर्षापासून रखडलेल्या कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामाचा प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली.करमनवाडी (ता.कर्जत) येथील नांदणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याच्या जलपूजनप्रसंगी ते बोलत होते. मंत्री शिंदे म्हणाले, यंदा जलयुक्त शिवाराची १ कोटी ७० लाख निधींची कामे प्रस्तावित आहेत. कर्जत-जामखेडमधील बंधा-यासाठी ४ कोटी ८२ लाख निधीची कामे झाली आहेत. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे सुरू असून त्यासाठी दहा कोटींचा निधी आला आहे. शेतक-यांनी पाणी वापराबाबतचे निकष ठेवावे व शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे तसेच पाणी वापर संस्था तयार केल्या पाहिजेत. या बंधा-याचा परिसरातील चार गावांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी नामदेव राऊत, कांतीलाल घोडके, अल्लाउद्दीन काझी, राजेंद्र देशमुख यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास जि. प. सदस्य कांतीलाल घोडके, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपचे ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, युवक नेते राजेंद्र देशमुख, पांडुरंग भंडारे, अंकुश बनसोडे, बापूराव धोंडे, ज्ञानदेव लष्कर, अमित मोरे, ज्ञानदेव सायकर, कुंडलिक सायकर, पवन जांभळकर, राजेंद्र घोडके, राजेंद्र सुपेकर, मालोजी भिताडे, सुनील काळे, प्रकाश शिंदे, किसन खराडे, सोमनाथ पाचारणे उपस्थित होते.ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे राशीन ते मोहितेवस्ती, चौकीचा लिंब ते करमनवाडी अंतर्गत रस्त्यांची मागणी केली. प्रास्ताविक डॉ.विलास राऊत यांनी केले. अ‍ॅड. हरिचंद्र राऊत यांनी सूत्रसंचालन केले. बापूराव धोंडे यांनी आभार मानले.--------------------------------------------------------------------------------------------(फोटो-२१ राशीन शिंदे १)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेKarjatकर्जत