चोरट्यांची हातसफाई, ट्रकचालकाची धुलाई, ‘सॅनिटायझर’चा ट्रकच पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 18:14 IST2020-06-11T18:05:47+5:302020-06-11T18:14:08+5:30
कर्जत (जि. अहमदनगर) : नगर-सोलापूर महामार्गाहून २१ लाख ९० हजार रूपयांचे सॅनिटायझर घेऊन चाललेला ट्रक पाटेवाडी शिवारात (ता. कर्जत) अडवून चौघांनी पळवून नेला. चालक, वाहकाला मारहाण करून लुटीची ही घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांची हातसफाई, ट्रकचालकाची धुलाई, ‘सॅनिटायझर’चा ट्रकच पळविला
कर्जत (जि. अहमदनगर) : नगर-सोलापूर महामार्गाहून २१ लाख ९० हजार रूपयांचे सॅनिटायझर घेऊन चाललेला ट्रक पाटेवाडी शिवारात (ता. कर्जत) अडवून चौघांनी पळवून नेला. चालक, वाहकाला मारहाण करून लुटीची ही घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथे ट्रकमध्ये (क्र. २८ बी. ए. १६९४) २१ लाख ९० हजार रूपयांचे सॅनिटायझर भरण्यात आले होते. तो ट्रक नगर-सोलापूरमार्गे केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे सॅनिटायझर घेऊन चालला होता. ट्रकमध्ये केवळ चालक, वाहक असे दोघेच होते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातील वळणावर गतिरोधक आहे. तेथे ट्रकचा वेग कमी झाल्यानंतर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी ट्रक अडविला. काही कळायच्या आतच त्यांनी चालक, वाहकाला खाली उतरवून बेदम मारहाण केली. त्या दोघांना धमकी देऊन ते लुटारू सॅनिटायझरसह ट्रक घेऊन सोलापूरच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी ट्रकचालक मनीवेल पेरूमल (वय ५२, रा. मुथ्थू हापट्टी, ता. जि. नामक्कल, तामिळनाडू) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ट्रकमधील २१ लाख ९० हजार रूपयांच्या सॅनिटायझर बॉटल, १० लाख रूपयांचा ट्रक, अशी त्या चोरांनी बत्तीस लाख रूपयांची लूट केली. घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी भेट दिली.