शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

चोरट्यांचा वृध्द पती-पत्नीवर चाकूने हल्ला; रोख रकमेसह मंगळसूत्र ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 16:53 IST

शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी रविवारी (दि.१४) पहाटे अडीचच्या सुमारास  चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व शेळ्या लंपास केल्या. दरम्यान, येथील एका वृध्द पती-पत्नीवर चोरट्यांनी चाकूने हल्ला करून काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यात वृध्द दाम्पत्य गंभीर जखमी झाले. 

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी रविवारी (दि.१४) पहाटे अडीचच्या सुमारास  चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व शेळ्या लंपास केल्या. दरम्यान, येथील एका वृध्द पती-पत्नीवर चोरट्यांनी चाकूने हल्ला करून काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यात वृध्द दाम्पत्य गंभीर जखमी झाले. 

     शिंगोरी येथील आबासाहेब यशवंत खंडागळे (वय ६०) व सुमन आबासाहेब खंडागळे (वय ५५) हे वृध्द दाम्पत्य रात्रीच्या सुमारास घरात झोपले असता, रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास चोरट्यांनी 'आबा दार उघडा, आम्हाला तहान लागली' अशी नावानिशी हाक मारली. तेव्हा आबासाहेब खंडागळे व त्यांच्या पत्नीस जाग आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहत 'बाहेरच पाणी आहे, ते प्या' असे सांगितले. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चालू केला.

      आबासाहेब खंडागळे यांना चोरट्यांचा अंदाज आल्याने ते घरात प्रतिकारासाठी साहित्य शोधू लागले. तेवढ्यात त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला. तेव्हा चार ते पाच चोरट्यांनी घरात घुसून चाकूने आबासाहेब खंडागळे यांच्यावर वार केले. झटापटीत त्यांच्या हात, छाती, डोळे व बरगड्यानजीक गंभीर जखमा झाल्या. चोरट्यांच्या तावडीतून सुटून ते पळाल्याने थोडक्यात बचावले.  त्यांच्या पत्नीला चोरट्यांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील अंदाजे १ तोळे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले व घरातील रोख ७ हजार ५०० रूपये चोरून चोरट्यांनी आरडाओरडा झाल्याने तेथून पळ  काढला. जखमींना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात हलविले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी