बोट्यात चोरट्यांनी चार दुकाने फोडली

By Admin | Updated: July 2, 2017 17:10 IST2017-07-02T17:10:54+5:302017-07-02T17:10:54+5:30

या चोरीत चोरट्यांनी रोख रकमेसह इतर साहित्य असा सुमारे ५० हजार रुपयांच्यावर ऐवज लंपास केला.

The thieves broke into four shops in the boat | बोट्यात चोरट्यांनी चार दुकाने फोडली

बोट्यात चोरट्यांनी चार दुकाने फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
बोटा : चोरट्यांनी धुमाकूळ घालत बोटा येथील रस्त्यालगतची चार दुकाने फोडली. या चोरीत चोरट्यांनी रोख रकमेसह इतर साहित्य असा सुमारे ५० हजार रुपयांच्यावर ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
बोटा येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या बाजूला असणारी चार दुकाने कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून शटर उचकून आतमध्ये प्रवेश केला. चोरीच्या या घटनांमध्ये चोरट्यांनी प्रशांत शेळके यांच्या कचेश्वर कलेक्शनमधील काउंटरच्या ड्रावरमधून रोख ३२ हजार रुपये विकास लामखडे यांच्या श्रीहरी ट्रेडर्स व रवींद्र पाडेकर यांच्या माऊली किराणा दुकान यामधून रोख तीन हजार रुपये व सुभाष शेळके यांच्या राहुल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातील पंधरा हजार रुपये किंमतीच्या बॅटरी व एलसीडी असा ऐवज लुटत पोबारा केला. रविवारी सकाळच्या सुमारास चोरीचा हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला.
बोटा परिसरात काही महिन्यांपूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत. कचेश्वर कलेक्शनचे प्रशांत सुधीर शेळके यांनी याबाबत घारगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The thieves broke into four shops in the boat