किराणा दुकान चोरट्यांनी फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:52+5:302021-04-09T04:20:52+5:30
नगर -मनमाड हायवेवर तीनचारी येथे दौलत वक्ते यांचे किराणा दुकान आहे. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे वेळेतच संध्याकाळी दुकान बंद करून ...

किराणा दुकान चोरट्यांनी फोडले
नगर -मनमाड हायवेवर तीनचारी येथे दौलत वक्ते यांचे किराणा दुकान आहे. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे वेळेतच संध्याकाळी दुकान बंद करून ते घरी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून
दुकानामधील तीस हजार रुपये किमतीचे सामान मंगळवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेले. सकाळी लखन बिडवे यांना दुकानात सुरू झाले असल्याचे लक्षात आले बॉक्समधील सर्व सामान काढून रिकामे बॉक्स दुकानाच्या बाहेर चोरट्यांनी फेकून दिले होते. त्यांनी लगेच वक्ते यांना फोन करून सदर बातमी दिली. दौलत वक्ते व जालिंदर चव्हाण घटनास्थळी येऊन पाहणी केली. माल चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दूरध्वनीवरून शहर पोलीस स्टेशनची संपर्क साधून पोलीस कॉन्स्टेबल दारकुंडे त्यांना याबाबत माहिती दिली. परिसरात पोलीस स्टेशनने गस्त घालून या चोरांना जेरबंद करावे, व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जालिंदर चव्हाण यांनी केली आहे.