शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चोर सुटले, पोलीस अडकले

By सुधीर लंके | Updated: October 30, 2020 16:53 IST

नगर जिल्ह्यात वाळू माफिया, रेशन माफिया यांचे मोठे जाळेच आहे. पण नाफ्ता भेसळीनंतर आता बनावट डिझेलच्या टोळीनेही डोके वर काढले की काय? अशी शंका उत्पन्न झाली आहे. सोमवारी नगर शहरात पकडलेल्या डिझेल साठ्याचे प्रकरण गंभीर दिसते. या प्रकरणात आपल्या कर्मचाºयांनी कारवाईत कमतरता ठेवली असा ठपका ठेवत एक अधिकारी व सात कर्मचारी पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले. मात्र, हे डिझेल आले कोठून? त्याची पाळेमुळे काय? याबाबत पोलीस अद्याप खोलात गेलेले दिसत नाहीत. गुन्ह्याच्या तपासाऐवजी पोलिसांवरील कारवाईला प्राधान्य दिल्याने या प्रकरणाबाबत शंका उत्पन्न झाली आहे. 

प्रासंगिक \ सुधीर लंके 

गत सोमवारी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने सोळाशे लिटरच्या डिझेलचा साठा पकडला. नगर शहरात टेलिफोन कार्यालय चौकातील छावणी कॉम्प्लेक्सजवळ एक टँकर नोझलने मालमोटारीत डिझेल भरत होता. एखादा पेट्रोल पंप भासावा असे ते दृश्य दिसते. पेट्रोलियम अ‍ॅक्टनुसार पेट्रोल पंपाच्या आवारातच वाहनात इंधन भरावे असा नियम आहे. त्यामुळे गल्लीत जाऊन पाणी वाटावे,  तसा डिझेल वाटण्याचा परवाना या टँकरला कुणी दिला? इंधनाची वाहतूक करण्यासाठी त्या टँकरला तसा परवाना घ्यावा लागतो. असा परवाना या टँकरने घेतलेला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.राठोड यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. प्रारंभी या पथकाने तडजोडीचा प्रयत्न केला, कागदपत्र अपुरी ठेवून आरोपीला मदत होईल असे कामकाज केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एक उपनिरीक्षक व सात पोलीस निलंबित केले आहेत. याशिवाय राठोड यांचीही गृह विभागाने बुधवारीच बदली केली आहे. पोलिसांनी कुचराई केली असेल तर कारवाई व्हायलाच हवी. मात्र, पोलीस उपअधिक्षक मदने यांनी पोलिसांची चौकशी इतकी घाईघाईने पूर्ण कशी केली? जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीही पंचनाम्यासाठी हजर राहणेबाबत नकार कळविला. डिझेल तपासणीचे किट आमच्याकडे उपलब्ध नसल्याने तुम्ही तुमच्यास्तरावर कारवाई करा, असे त्यांनी कळविले. जिल्हा पुरवठा अधिका?्यांना कोणत्याही पेट्रोल पंपावरुन इंधनाचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्याचा अधिकार आहे. त्यांच्याकडे  निरीक्षक आहेत. यंत्रणा नसेल तर हे कार्यालय पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाºयांची यंत्रणाही उपलब्ध करु शकत होते. मात्र, आम्ही येऊ शकत नाही असे त्यांनी कळविले. त्यांची ही भूमिका संशयास्पद व जबाबदारी टाळणारी वाटते. मात्र याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांपैकी कोणीच केलेली दिसत नाही. राठोड यांची बदली होताच गुरुवारी राठोड व पोलीस कॉन्स्टेबल गर्जे यांच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली. हे संभाषण खरे असेल तर ती गंभीर बाब आहे. त्याबद्दल या दोघांवरही कारवाई व्हायला हवी. मात्र, राठोड यांची बदली या संभाषणामुळे झाली की डिझेल प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे? असाही प्रश्न आहे. आपण डिझेल प्रकरणात केलेल्या कारवाईमुळेच आपली बदली झाली अशी प्रतिक्रिया राठोड यांनी एका वाहिनीला दिली. तसे असेल तर तेही गंभीर आहे. कुणाला वाचविण्यासाठी पोलिसांचा बळी घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास आता उपअधीक्षकांकडे सोपविला आहे. कर्मचाºयांनी छाप्यात काही गडबडी केल्या असतील तर ते कारवाईस पात्र आहेत. पण, त्यांनी जो काही गुन्हा दाखल केला आहे त्याच्या तपासाबाबत काय कार्यवाही झाली आहे.  डिझेल आले कोठून? ते बनावट असेल तर कोेठे बनले? त्याचे सूत्रधार कोण आहेत?  हे प्रश्न संपलेले नाहीत. पोलिसांवरील कारवाई सुडबुध्दीने तर झालेली नाही ना? याचाही शोध घेणे आवश्यक आहे.

डिझेल कारवाईत राजकीय दबाव ?याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. सोमवारपासून ते आजपर्यंत या प्रकरणात केवळ गौतम वसंत बेळगे हा एकच आरोपी अटकेत आहे. त्याच्याव्यतिरिक्त एकही आरोपी अटक नाही. टँकरमधील हे  डिझेल राहुरी येथील पंपावरुन आले होते असे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले. हा पेट्रोल पंप कुणाचा आहे? राहुरी येथून त्यांनी नगरला हा टँकर का पाठविला? या पंपचालकावर काय कारवाई झाली हे काहीच अजून समोर आलेले नाही. पोलिसांवर जितक्या तडकाफडकी कारवाई झाली तितक्या जलदगतीने गुन्ह्याचा तपास होताना दिसत नाही. त्यामुळे डिझेलचा घोटाळा उघड होऊ नये असा काही दबाव आहे का? पोलीस पथकाने केलेली ही कारवाई काही मंडळींना आवडलेली नाही काय? अशाही शंका या प्रकरणात निर्माण झाल्या आहेत. तसे नसेल तर अधीक्षकांनी गुन्ह्याचा तपासही पुढे नेणे आवश्यक होते. हे डिझेल बनावट असेल तर ती गंभीर बाब आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी