भगवानगडावर दसरा मेळावा होणारच
By Admin | Updated: January 12, 2016 23:33 IST2016-01-12T23:21:16+5:302016-01-12T23:33:28+5:30
पाथर्डी : ७ जानेवारी रोजी पंकजा मुंडे यांनी गडावर जाऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नामदेवशास्त्री यांची भेट घेतली.

भगवानगडावर दसरा मेळावा होणारच
पाथर्डी : ७ जानेवारी रोजी पंकजा मुंडे यांनी गडावर जाऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत दसरा मेळाव्यासंदर्भात कोणतीही चर्चा न होता, ही भेट अवघ्या पाच मिनिटात संपल्याने मुंडे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर मुंडे समर्थक अॅड.विक्रम डोंगरे, भगवान पालवे, गंगाधर गर्जे, भास्कर पालवे, उत्तम बारगजे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, निवृत्ती खेडकर आदींनी पत्रक काढले असून दसरा मेळावा भगवानगडावरच होणार असल्याचे म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने गादीवर बसलेल्या नामदेवशास्त्रींच्या दर्शनासाठी पंकजा मुंडेंनी मान झुकवली तर त्यांच्या आशीर्वादाची थाप पाठीवर देण्याऐवजी नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अपमानीत करत लवकर निघून जाण्यास भाग पाडले.
राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद भूषवणाऱ्या मुंडेंचा अपमान हा गडाला मानणाऱ्या भाविकांचा अपमान आहे. गडाची संस्कृती जपत नामदेवशास्त्रींनी मुंडे यांचे स्वागत करायला हवे होते, असे या पत्रकात यांनी नमूद केले आहे.
(तालुका प्रतिनिधी)