यशाला कोणताही शॉर्टकट नसतो : डोमाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:22 IST2021-02-16T04:22:40+5:302021-02-16T04:22:40+5:30

टाकळीमानूर : कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. यशाला कोणताही शॉर्टकट नाही. स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीची तयारी ...

There is no shortcut to success: Domale | यशाला कोणताही शॉर्टकट नसतो : डोमाळे

यशाला कोणताही शॉर्टकट नसतो : डोमाळे

टाकळीमानूर : कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. यशाला कोणताही शॉर्टकट नाही. स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीची तयारी करणारांनी प्रामाणिकपणे कष्ट करावे यश निश्चितच मिळेल, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांनी केले.

डोमाळे व प्रदीप बाेरूडे हे पाेलीस खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन उपनिरीक्षक झाले. या दोघांचाही टाकळीमानूर (ता. पाथर्डी) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुठेही सेवेत असलो तरी टाकळीमानूरकरांच्या मदतीला येऊन ऋण फेडण्याचा प्रयन करणार आहे, अशी ग्वाही डोमाळे यांनी दिली. यावेळी गहिनाथ शिरसाठ, डॉ. विजय किसवे, शुभम गाडे, नानासाहेब गाडे, राजेंद्र नागरे, आप्पासाहेब शिरसाठ, मुरलीधर ठोंबरे, गोकुळ ठोंबरे, पोपटराव शिरसाठ, संजय ठोंबरे, आजिनाथ खेडकर, उमेश ठोंबरे, गणेश कारंडे, सर्जेराव महानोर, उत्तम किसवे, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

फोटो : १५ टाकळीमानूर

Web Title: There is no shortcut to success: Domale