भगवंताशिवाय परमार्थात अर्थ नाही
By Admin | Updated: August 4, 2014 00:43 IST2014-08-03T23:38:59+5:302014-08-04T00:43:46+5:30
संगमनेर : निसर्गाचा परस्परविरोधी समन्वय साधण्याचे काम संत करीत असतात.
भगवंताशिवाय परमार्थात अर्थ नाही
संगमनेर : निसर्गाचा परस्परविरोधी समन्वय साधण्याचे काम संत करीत असतात. जोपर्यंत भगवंत तुमच्यात येत नाही, तोपर्यंत परमार्थात काही अर्थ नाही, असे प्रतिपादन सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्रीक्षेत्र तळेगाव दिघे येथे आयोजित सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. जीवनात सुख-समाधान प्राप्त करायचे असेल तर प्रत्येकाने परमार्थ करावा. व्यसन व वाईट सवयींपासून दूर जाणे महत्वाचे आहे. मनात काम, क्रोध व लोभ असेल तर परमार्थाचा उपयोग नाही. आधी मनातील वाईट विचार नष्ट करायला हवे. सत्संगात आत्मविश्वासाने राहिल्यास नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी दूध संघाचे संचालक रणजीत देशमुख, शरयू देशमुख, दिलीप शिंदे, रावसाहेब म्हस्के, शिवशाहीर विजय तनपुरे, नवनाथ महाराज आंधळे, अजय फटांगरे, कपील पवार, अण्णासाहेब थोरात, बाळकृष्ण कापसे, अविनाश सोनवणे, मनोज चव्हाण, सचिन दिघे, प्रभाकर कांदळकर, रावसाहेब दिघे आदींसह संगमनेर, कोपरगाव, राहाता, येवला, सिन्नर, निफाड व अकोले तालुक्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी करून आभार मानले.
(प्रतिनिधी)
मदतीचे आवाहन
माळीण गावावर डोंगरकडा कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेले. जे वाचले त्यांचा संसार गाळामध्ये गडप झाला. म्हणून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून दुर्घटनाग्रस्तांना मदत करावी.
- महंत रामगिरी महाराज