खडसे प्रकरणी तूर्तास आंदोलन नाही
By Admin | Updated: June 2, 2016 23:06 IST2016-06-02T22:53:01+5:302016-06-02T23:06:20+5:30
पारनेर : मी आजपर्यंत अनेक आंदोलने केली. परंतु सबळ पुराव्याशिवाय कधीही बोललो नाही. एकनाथ खडसे यांच्याविषयी माझ्याकडे जोपर्यंत सबळ पुरावे नाहीत तोपर्यंत केवळ हवेत बोलणे योग्य होणार नाही,

खडसे प्रकरणी तूर्तास आंदोलन नाही
पारनेर : मी आजपर्यंत अनेक आंदोलने केली. परंतु सबळ पुराव्याशिवाय कधीही बोललो नाही. एकनाथ खडसे यांच्याविषयी माझ्याकडे जोपर्यंत सबळ पुरावे नाहीत तोपर्यंत केवळ हवेत बोलणे योग्य होणार नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
अण्णा म्हणाले, अंजली दमानिया यांनी बुधवारी माझी भेट घेतली. त्यांनी एकनाथ खडसे यांच्या जमीन खरेदीविषयीची कागदपत्रे माझ्याकडे दिलेली आहेत. परंतु कागदपत्रांचा अभ्यास करायला वेळ मिळालेला नाही. परंतु दमानिया यांनी जे इतर आरोप केलेले आहेत त्यासंबंधीची कागदपत्रे मला अद्याप मिळालेली नाही. ठोस पुरावे मिळाले तर मी जरूर विचार करीन. मात्र घाईघाईने काही करणे योग्य नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यापूर्वी मी सबळ पुरावे पाहतो. कारण माझ्यासमोर व्यक्ती किंवा पक्ष कधीच नसतो. मी केवळ समाज व देशाचा विचार करतो. खडसेंवरील आरोपाच्या चौकशीसाठी उपोषण करणे हा दमानिया यांचा स्वत:चा निर्णय आहे. अंजली दमानिया अण्णांना भेटून गेल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या चौकशीसाठी अण्णा आंदोलन करतील, मुख्यमंत्र्यांना भेटतील, पंतप्रधानांना पत्र लिहितील असे उलटसुलट मतप्रवाह आहेत. त्या पार्श्वभूमीवर अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)