ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:38 IST2021-02-21T04:38:57+5:302021-02-21T04:38:57+5:30
लोहगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात ...

ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे
लोहगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरणही करण्यात आले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, सभापती नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, कविता लहारे, बाळासाहेब म्हस्के, सरपंच स्मिता चेचरे, प्रा. सुरेश चेचरे, केरुनाथ चेचरे, लहानू चेचरे, वैशाली गिरमे, निर्मला दरंदले, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.
विखे म्हणाले, कोरोनाच्या संकटानंतर आर्थिक व्यवस्था रुळावर आणण्याच्या दृष्टीने सरकारने यशस्वी प्रयत्न सुरू केले आहेत. शिर्डी विमानतळ ही आपल्या दृष्टीने मोठी उपलब्धी असून, अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी स्थानिक पातळीवर मिळाव्यात यासाठी आयटी पार्क सुरू करण्याचा मानस आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळांनी वेगळा ठसा उमटविला आहे. या शाळांमधील विद्यार्थीसुद्धा आयएएस आणि आयपीएस झाल्याची उदाहरणे आपण पाहत आहोत. भविष्याची गुंतवणूक म्हणून आता या शाळांचा दर्जा सुधारण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. सर्वांच्या संघटितपणामुळेच गावपातळीर विकास साध्य होऊ शकला.
( फोटो आहे)