थेरवडी तलावाने गाठला तळ

By Admin | Updated: June 28, 2014 01:12 IST2014-06-27T23:33:53+5:302014-06-28T01:12:07+5:30

कर्जत : कर्जत-राशीन या दोन शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या थेरवडी तलावासह बारा तलावांच्या परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा, असे तहसीलदारांचे आदेश

Therapeutic fort | थेरवडी तलावाने गाठला तळ

थेरवडी तलावाने गाठला तळ

कर्जत : कर्जत-राशीन या दोन शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या थेरवडी तलावासह बारा तलावांच्या परिसरातील वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा, असे तहसीलदारांचे आदेश असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केले. यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
यावर्षी लांबलेला पाऊस पाहता कर्जतचे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी थेरवडी दूरगाव तलावालगतचे सर्व कनेक्शन तोडून वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची पर्वा न करता जोमाने पाणी उपसा केला व ते पाणी पिकांना दिले यामुळे थेरवडी दूरगाव तलावासह सर्वच तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. दूरगाव व थेरवडी तलावात कुकडीचे पाणी सोडणे गरजेचे आहे. मागणी करूनही प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. लोकसभा निवडणूक काळात मागणी नसतानाही मतांवर डोळा ठेवून कुकडीला पाणी सोडले होते. थेरवडी तलावावर ५० ते ६० हजार लोक पाण्यासाठी अवलंबून आहेत. तर दूरगाव तलावावर टँकर भरले जातात किमान या दोन ठिकाणी कुकडीचे पाणी सोडणे गरजेचे आहे.
कर्जत तालुका मोठ्या पाणी टंचाईशी दोन हात करत आहे. ३२ टँकरद्वारे ३० गावे व १२६ वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. आणखी ८ गावाला टँकर सुरू करावेत यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पडून आहेत. कर्जत तालुका दुष्काळासाठी प्रसिद्ध आहे. मग तो टँकरचा असो किंवा पाण्याचा यामध्ये आता आणखी भर पडली आहे. गेल्या वर्षभरापासून येथील टंचाई विभाग अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. जून २०१३ पासून या विभागाला निधी प्राप्त झाला नाही. यामुळे ३ कोटी ४० लाख रुपयांची देणी थकली आहेत. या सर्वच बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.तालुक्यातील जनता पाणी टंचाईशी मुकाबला करत असताना तलावाच्या परिसरातील शेतकरी मात्र बिनधास्त आहेत. त्यांची पिके हिरवीगार होऊन डौलत आहेत. इकडे मात्र पाण्याची भांडी रिकामी आहेत हा विरोधाभास पहावयास मिळतो आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Therapeutic fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.