तर पुन्हा राम, लक्ष्मण यांचे राज्य शक्य
By Admin | Updated: April 9, 2016 00:30 IST2016-04-09T00:27:04+5:302016-04-09T00:30:09+5:30
जवळे : जर प्रत्येकाने ठरविल्यास समाजात निश्चित राम, लक्ष्मण यांचे राज्य येऊन समाजातील भेदभाव नष्ट होतील, असा विश्वास रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी व्यक्त केला.

तर पुन्हा राम, लक्ष्मण यांचे राज्य शक्य
जवळे : जर प्रत्येकाने ठरविल्यास समाजात निश्चित राम, लक्ष्मण यांचे राज्य येऊन समाजातील भेदभाव नष्ट होतील, असा विश्वास रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी व्यक्त केला.
मळगंगा डेअरी फार्म (कन्हैय्या दूध) या संस्थेच्या १९ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त निघोज (ता. पारनेर) येथे आयोजित ‘कीर्तन महोत्सव २०१६’ ची शुक्रवारी सांगता झाली.
ढोक महाराज म्हणाले, प्रत्येकाला थोरल्या व लहान भावाची किंमत कळत नाही. ते आपल्यात आहेत, तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम करा. एकोप्याने रहा. हा एकोपा गेल्यानंतर शोक करू नका. शांताराम लंके, बबनभाऊ लंके हे समाजाला आदर्शवत आहेत. त्यांचा वारसा मच्छिंद्र लंके यांनी चालू ठेवला आहे. त्यांनी दूध व्यवसायाचा वटवृक्ष केला आहे. समाजाला हे प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गारही ढोक महाराजांनी काढले. यावेळी उद्योजक शांताराम लंके, बबनभाऊ लंके, उद्योजक मच्छिंद्र लंके, उद्योजक विलास लंके, श्रीगोंदा दूध संघाचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, वाडेगव्हाण सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक शेळके, जवळेचे माजी सरपंच सखाराम आढाव, नानासाहेब लंके, दत्तात्रय लंके, निघोजचे उपसरपंच बाबाजी लंके तसेच भाविक हजर होते. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या सप्ताहामुळे जवळे भक्तिमय झाले होते. (वार्ताहर)