चार हजार रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:44+5:302021-07-02T04:15:44+5:30

----------------- चार दुचाकी चोरीला अहमदनगर : केडगाव, भूषणनगर येथील मनोज भाऊसाहेब नांगळ यांची १० हजार रुपये किमतीची हिरो होंडा ...

Theft of four thousand rupees | चार हजार रुपयांची चोरी

चार हजार रुपयांची चोरी

-----------------

चार दुचाकी चोरीला

अहमदनगर : केडगाव, भूषणनगर येथील मनोज भाऊसाहेब नांगळ यांची १० हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी चोरीला गेली. २९ रोजी ही दुचाकी हॉटेल रंगोलीच्या कंपाऊंडजवळून चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश आनंदा ठोकळ (रा. कामरगाव, ता. नगर) यांचीही दुचाकी २३ जून रोजी हॉटेल स्माईल स्टोनजवळून चोरीला गेली. काळ्या रंगाची ही दुचाकी दहा हजार रुपये किमतीची असल्याचे नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. विनायक सदाशिव गाढे (रा. तरपुरेवाडी, ता. नगर) यांची दुचाकी ३० जूनला नगर येथील अरुणोदय हॉस्पिटलच्या पाठीमागून चोरीला गेली. याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच संजय आप्पासाहेब धामणे यांची दुचाकी सारोळा कासार (ता. नगर) येथून चोरीला गेली आहे.

--------

सैन्य दलाची फसवणूक

अहमदनगर : तामिळनाडूतील मदुराई येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना, तो लपवून ठेवल्याप्रकरणी प्रवीणकुमार एस. याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल असतानाही प्रवीणकुमार याने भरतीसाठी सैन्य दलास खोटे प्रमाणपत्र दिले. आर्मी ट्रेनिंग सेंटर येथे २३ डिसेंबर २०१९ ते ४ जून २०२१ या कालावधीत प्रवीणकुमार याने सदर प्रमाणपत्र दिले होते. आर्मड्‌ रेजिमेंटमधील एल. भूपंदर सिंग यांनी याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून प्रवीणकुमार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

--------------

Web Title: Theft of four thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.