महिलेस मारहाण करून चोरी

By | Updated: December 8, 2020 04:17 IST2020-12-08T04:17:26+5:302020-12-08T04:17:26+5:30

कोपरगाव : घरामध्ये एकटी असलेल्या महिलेला दहा महिला व पुरुषांनी तिच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरातील ...

Theft by beating a woman | महिलेस मारहाण करून चोरी

महिलेस मारहाण करून चोरी

कोपरगाव : घरामध्ये एकटी असलेल्या महिलेला दहा महिला व पुरुषांनी तिच्या घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरातील १५ हजार रुपये किमतीचे कपाट, शोकेस, मांडणी, पलंग व भांडे चोरून नेले.

ही घटना कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे शनिवारी (दि.५) रात्री घडली. याप्रकरणी बेबी करीम शेख (रा. डाऊच खुर्द, ता. कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून अमिना सलिम शेख, सचिन दिलीप दोडकर, सौरव विकी रोजारियो, उमेश विनोद तायडे, शाहरुख मन्सुर काजी, बबलू दत्तू पवार, टेम्पो (क्र. एमएच १७ बीवाय ११२३) वरील चालक (नाव, पत्ता माहीत नाही.) तसेच इतर तीन अनोळखी महिला (सर्व रा. कालीकानगर, शिर्डी, ता. राहाता) अशा दहा जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी यातील सचिन दोडकर, सौरव रोजारियो, उमेश तायडे, शाहरुख काजी, बबलू पवार या पाच आरोपींना अटक करून रविवारी (दि.६) कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे करीत आहेत.

Web Title: Theft by beating a woman