पोलिसाच्या घरी चोरीचा प्रयत्न

By Admin | Updated: August 13, 2015 23:10 IST2015-08-13T22:58:17+5:302015-08-13T23:10:27+5:30

अहमदनगर : कल्याण रोड भागातील रहिवासी व पोलीस कर्मचारी राजाराम शिवराम शेंडगे (रा. विद्या कॉलनी, आदर्शनगर) यांच्या घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

Theft attempt at the police's house | पोलिसाच्या घरी चोरीचा प्रयत्न

पोलिसाच्या घरी चोरीचा प्रयत्न

अहमदनगर : कल्याण रोड भागातील रहिवासी व पोलीस कर्मचारी राजाराम शिवराम शेंडगे (रा. विद्या कॉलनी, आदर्शनगर) यांच्या घरात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र चोरटे घरात शिरल्याची चाहूल लागताच शेंडगे यांनी गोळीबार केला. त्यानंतर चोरटे पसार झाले. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी राजाराम शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घराच्या मागील बाजूचे खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरटे घरात शिरल्यानंतर शेंडगे यांना जाग आली. त्यांना घरात चोरटे शिरल्याचे दिसताच त्यांनी पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली. त्यावेळी चोरटे पसार झाले. मात्र पोलिसाच्या घरीच चोरी झाल्याने सभोवतालच्या नागरिकांमध्ये चोरट्यांची भीती निर्माण झाली आहे. या भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून एकाच आठवड्यात पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. तसेच गेल्या आठवड्यात एकाच रांगेतील दुकानांमधून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.
(प्रतिनिधी)

Web Title: Theft attempt at the police's house