कारच्या चारही चाकांची घरासमोरूनच चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:56 IST2021-02-20T04:56:30+5:302021-02-20T04:56:30+5:30

नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील संदेश जयंत काळे यांच्या घरासमोरून सोमवारी (दि.१५) पहाटे तीनच्या सुमारास कारच्या चारही ...

Theft of all four wheels of the car in front of the house | कारच्या चारही चाकांची घरासमोरूनच चोरी

कारच्या चारही चाकांची घरासमोरूनच चोरी

नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील संदेश जयंत काळे यांच्या घरासमोरून सोमवारी (दि.१५) पहाटे तीनच्या सुमारास कारच्या चारही चाकांची चोरी झाली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात संदेश जयंत काळे (रा. भानसहिवरा) यांनी फिर्याद दिली.

काळे यांनी रविवारी रात्री अकराच्या सुमारास हॉटेलचे कामकाज संपवून कार घरासमोर लावली होती. रात्री एकच्या सुमारास त्यांच्यासह कुटुंबीय झोपले. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास काळे यांचे वडील लघुशंकेसाठी बाहेर आले असता त्यांना कारची चाके गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ घडलेला प्रकार घरातील सदस्यांना सांगितले. काळे व त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात चाकांचा शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक बबन तमनर करीत आहेत.

----

१८ भानसहिवरा

भानसहिवरा येथील चारही चाके चोरून नेलेली कार.

Web Title: Theft of all four wheels of the car in front of the house