शेतीपंपाच्या केबलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:24+5:302021-03-15T04:19:24+5:30

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांबूत बुद्रुक येथील विठ्ठल विष्णू भागवत या शेतकऱ्याची शेतीपंपाची केबल चोरट्यांनी चोरून ...

Theft of agricultural pump cable | शेतीपंपाच्या केबलची चोरी

शेतीपंपाच्या केबलची चोरी

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांबूत बुद्रुक येथील विठ्ठल विष्णू भागवत या शेतकऱ्याची शेतीपंपाची केबल चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जांबुत बुद्रुक याठिकाणी विठ्ठल भागवत हे शेतकरी राहात आहेत. त्यांची मुळा नदीकाठी सामायिक विहीर आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार सोडण्यात आली आहे. विहिरीपासून ते मोटारीच्या खोक्यापर्यंत सहा एम. एम. जाडीची (१५२) मीटर लांबीची केबल टाकण्यात आली होती. मात्र, दिनांक ११ ते १३ या दोन दिवसांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ही केबल चोरून नेली आहे. सुमारे अठरा हजार रुपये किमतीची केबल होती.

याप्रकरणी विठ्ठल विष्णू भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस हेडकाॅन्स्टेबल दशरथ वायाळ हे करत आहेत.

Web Title: Theft of agricultural pump cable