मंदिराची दानपेटी फोडली, रक्कम पळवली; श्रीरामपूर तालुक्यातील घटना
By शिवाजी पवार | Updated: July 4, 2023 16:53 IST2023-07-04T16:53:00+5:302023-07-04T16:53:26+5:30
यापूर्वीही याच मंदिराचा कळस चोरून नेण्याची घटना घडली होती

मंदिराची दानपेटी फोडली, रक्कम पळवली; श्रीरामपूर तालुक्यातील घटना
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): तालुक्यातील टाकळीभान येथे साईबाबा मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. यापूर्वीही याच मंदिराचा कळस चोरून नेण्याची घटना घडली होती. त्या घटनेचा तपास सुरू असताना ही घटना घडली आहे.
सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. वाडगाव रस्त्यावर असलेल्या साईबाबा मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. याच मंदिरातील पितळी कळस तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी चोरून नेला होता. दानपेटी फोडण्याची गावातघटना यापूर्वीही गावात घडली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
तालुका पोलिसांनी तातडीने चोरांचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथे नियुक्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.