दुधाळ यांनी मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST2021-05-16T04:19:09+5:302021-05-16T04:19:09+5:30

देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुस्लीम पंच कमिटी अध्यक्ष शकिलभाई शेख, रफीकभाई शेख, शशिकांत मिसाळ, शिराज सय्यद, मन्सूर ...

Thank you Dudhal | दुधाळ यांनी मानले आभार

दुधाळ यांनी मानले आभार

देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुस्लीम पंच कमिटी अध्यक्ष शकिलभाई शेख, रफीकभाई शेख, शशिकांत मिसाळ, शिराज सय्यद, मन्सूर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी मुस्लीम समाजाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. ईदची नमाज घरात अदा केल्याबद्दल समाजाचे आभार मानले व गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देवळाली प्रवरा येथील सामाजिक एकोप्याविषयी माहिती देऊन मागील वर्षी दोन हजार लोकांना कोरोना काळात ईदनिमित्त शिरखुरमा दिल्याची घटना विषद केली. शहराच्या संकट काळात मुस्लीम समाज नेहमीच साथ देतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले.

मुस्लीम समाजाच्यावतीने अध्यक्ष शकीलभाई व रफीक शेख यांनी दुधाळ यांचा सन्मान केला.

Web Title: Thank you Dudhal