कोपरगावमध्ये सकल मराठा समाजाच्या ९ आॅगस्टला ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:22 IST2018-07-31T16:22:05+5:302018-07-31T16:22:21+5:30
सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना मराठा आरक्षण व इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले.

कोपरगावमध्ये सकल मराठा समाजाच्या ९ आॅगस्टला ठिय्या आंदोलन
कोपरगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना मराठा आरक्षण व इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले.
मागील वर्षी महाराष्ट्रभर ५८ मूक मोर्चे काढून आमच्या मागण्याचे निवेदन दिले आहे .तरी सदर मागण्याची ८ आॅगस्ट २०१८ पर्यंत अंमलबजावणी करण्यात यावी आणि तसे न झाल्यास येत्या ९ आॅगस्टपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी राहुल दिवेदी व कोपरगावचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांना पाठवले आहे .निवेदनावर अमित आढाव, दिनेश पवार,विनायक भगत, साई नरोडे, निखील डांगे, संदीप डुंबरे, रोहित इरांडे, अक्षय आगे, भूषण मुलीक, भूषण पाटकर आदीच्या सह्या आहेत .