सोशल मीडियावर महापुरुषाची बदनामी करणारा मजकूर, श्रीरामपुरात एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 17:02 IST2020-06-16T17:02:16+5:302020-06-16T17:02:23+5:30
श्रीरामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी तालुक्यातील दिघी येथील एका तरुणाला सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरूद्ध धार्मिक भावना दुखाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर महापुरुषाची बदनामी करणारा मजकूर, श्रीरामपुरात एकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी तालुक्यातील दिघी येथील एका तरुणाला सोमवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरूद्ध धार्मिक भावना दुखाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रशांत गायकवाड (वय २३, रा. दिघी) असे आहे. शहरात अशा स्वरुपाची एक कारवाई दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. सामाजिक कार्यकर्ते विकास नरोडे (वय २९, अतिथी कॉलनी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बदनामी करणारा मजकूर आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने भावना दुखावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीला अटक करावी या मागणीसाठी काही कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी याप्रकरणी कारवाई केली. त्यामुळे समाज विघातक प्रवृत्तींना आळा बसणार आहे.