कोरोना तपासणी किट नसल्याने चाचण्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:09+5:302021-05-01T04:19:09+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कोरोना चाचणी किटचा गेल्या काही दिवसांत तुटवडा आहे. त्यामुळे कोरोना ...

कोरोना तपासणी किट नसल्याने चाचण्या बंद
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कोरोना चाचणी किटचा गेल्या काही दिवसांत तुटवडा आहे. त्यामुळे कोरोना तपासणी चाचण्याही ठप्प झाल्या आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीचीही पुरेशी उलब्धता नसल्याने नागरिकांसह आरोग्य प्रशासनही हैराण झाले आहे.
कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करण्यात येते. प्रतिदिन २०० ते २५० गरजू रुग्णांची तपासणी केली जात आहे. मात्र रविवारी किट संपले. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांना पाथर्डी येथे चाचण्यांसाठी जावे लागले. तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठ्या लोकसंख्येची २३ गावे तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येतात. कार्यक्षेत्र व लोकसंख्याही मोठी आहे. लसीसह चाचण्या किटची उपलब्धता प्रशासनाने लवकर करावी, अशी मागणी होत आहे.
--
कोरोना चाचणी किटसह लसीची वानवा असल्याने तिसगाव परिसरातील अनेकांची गैरसोय होत आहे. आरोग्य विभागाने लवकरात लवकर किट व लसीची उपलब्धता करून द्यावी.
- सुनील परदेशी,
पंचायत समिती सदस्य
--
चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस शुक्रवारी उपलब्ध झाली आहे. जिल्हास्तरावर किटची मागणी केली आहे. किटसुद्धा लवकरच प्राप्त होतील.
-डॉ. बाबासाहेब होडशिळ,
वैद्यकीय अधिकारी, तिसगाव