चौकाच्या नामकरणावरून राशीनमध्ये तणाव
By Admin | Updated: February 21, 2016 23:44 IST2016-02-21T23:42:44+5:302016-02-21T23:44:31+5:30
कर्जत : चौकाचे नामकरण व झेंडा लावण्याच्या कारणावरून राशीन येथे रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. सायंकाळी उशिरा मुख्य रस्त्यावर दगडफेक झाली.

चौकाच्या नामकरणावरून राशीनमध्ये तणाव
कर्जत : चौकाचे नामकरण व झेंडा लावण्याच्या कारणावरून राशीन येथे रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. सायंकाळी उशिरा मुख्य रस्त्यावर दगडफेक झाली. शहरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
राशीन येथे बसस्थानकासमोरील चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळील चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व शंभुराजे चौक अशी दोन नावे देण्यात आली आहेत. शंभुराजे चौकाचा फलक लावण्यासाठी रविवारी चौथरा उभारण्यात आला. या प्रकाराने राशीन शहरात तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाले.
दुपारी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर जमाव पांगला. यावेळी पोलिसांनी लाठीमारही केला. जमाव पांगल्यानंतर शंभुराजे चौक फलकासाठी उभारलेला चौथरा पोलिसांनीच हटविला. घटनास्थळाला पोलीस उपअधीक्षक पंकज देशमुख यांनी भेट दिली. सायंकाळी पुन्हा दोन्ही बाजूंचा जमाव एकत्र झाला. त्यानंतर दगडफेक झाली. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले.
(तालुका प्रतिनिधी)