अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी

By Admin | Updated: July 9, 2014 00:05 IST2014-07-08T23:17:03+5:302014-07-09T00:05:10+5:30

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी किसन उर्फ कृष्णा बारकू पानकर याला जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Ten Years end to the oppressor | अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी

अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी किसन उर्फ कृष्णा बारकू पानकर (वय ४२, रा. दहिगावने, ता. शेवगाव) याला जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार ही शिक्षा झाली आहे.
जानेवारी २०१३ मध्ये शेवटच्या आठवड्यात फिर्यादिची मतिमंद अल्पवयीन मुलगी (वय १४ वर्षे) ही नैसर्गिक विधीकरीता गेली असता तेथे आरोपीने शेळ््या चारीत असताना बोरे देतो म्हणून तिला ज्वारीच्या शेतात नेले. तिच्या भोळसर स्वभावाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अत्याचारित मुलीच्या आईने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार सदर खटला नगरचे विशेष जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ यांच्या न्यायालयात दाखल झाला होता. सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये अत्याचारित मुलीचा जबाब व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. सरकार पक्षातर्फे नगरचे सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता प्रकाश गायकवाड यांनी काम पाहिले. अत्याचारित मुलगी मानसिकदृष्ट्या दुर्बल असून तिच्या भोळसरपणाचा व आरोपीची स्वत:ची मुलगी तिच्या वर्गात शिकत असल्याचे माहिती असूनही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन अत्याचार केल्याचा वैद्यकीय पुरावाही सरकार पक्षाने सादर केला. सदरचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली. तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४ नुसार १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षाही सुनावली. (प्रतिनिधी)

Web Title: Ten Years end to the oppressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.