दहा हजार बालकांना पोलिओचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:45+5:302021-02-05T06:40:45+5:30
पल्स पोलिओ मोहीम राबविताना प्रशासनाने शहरात ३३ केंद्र उभारली होती. यात दोन बूथ मोबाईल पथकासह प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी तसेच ...

दहा हजार बालकांना पोलिओचे लसीकरण
पल्स पोलिओ मोहीम राबविताना प्रशासनाने शहरात ३३ केंद्र उभारली होती. यात दोन बूथ मोबाईल पथकासह प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी तसेच रुग्णालयांमध्ये मोहीम राबविण्यात आली .
नगराध्यक्षा अनुराधा आदिक, रोटरीचे सचिव हरसुख पद्मानी, राजेश कुंदे, उल्हास धुमाळ, विशाल कोटक, नीलेश चुडीवाल, प्रेम नारा, बाळासाहेब पटारे, भाऊसाहेब वाघ, रईस जहागीरदार, राजेश शहा, उदय बधे, गुरुमुख रामनाणी, सागर चोरडिया, विशाल फोपळे, प्रसन्न धुमाळ, डॉ. योगेश बंड यावेळी उपस्थित होते.
सर्व केंद्रांवरील आशासेविका व आरोग्य कर्मचार्यांना रोटरीच्या वतीने जेवणाची पाकिटे देण्यात आली. शहरातील उर्वरित १८६६ बालकांना येत्या पाच दिवसात घरोघरी जाऊन हा डोज दिला जाणार असल्याचे डॉ. पऱ्हे यानी सांगितले.
-----