निंबळक येथे दहा दिवस लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:50+5:302021-04-04T04:21:50+5:30

निंबळक : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता निंबळक (ता. नगर) येथील ग्राम सुरक्षा समितीने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला ...

Ten days lockdown at Nimbalak | निंबळक येथे दहा दिवस लॉकडाऊन

निंबळक येथे दहा दिवस लॉकडाऊन

निंबळक : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता निंबळक (ता. नगर) येथील ग्राम सुरक्षा समितीने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत, अशी माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली.

निंबळक येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गावाजवळच एमआयडीसी असल्याने कामावर जाणाऱ्या कामगारवर्गाची संख्या जास्त आहे. गावामधून परिसरातील सहा ते सात गावांच्या नागरिकांची निंबळक मार्ग रहदारी चालू असते. कंपनीतून सुटल्यानंतर कामगार भाजीपाला, किराणा, इतर साहित्य घेण्यासाठी येथील मुख्य चौकात येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बहुतेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. यामुळे कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक घेण्यात आली. सकाळी ८ ते १२ वेळेत दुकाने उघडे राहतील. नंतर दवाखाना, मेडिकल, दूध डेअरी फक्त उघडे राहतील. विनाकारण फिरणारे तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना शंभर रुपये दंड करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच बाळासाहेब कोतकर, घनश्याम म्हस्के, भाऊराव गायकवाड, सोमनाथ खांदवे, समीर पटेल, तलाठी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Ten days lockdown at Nimbalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.