आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के बेड आरक्षित ठेवावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:20 IST2021-05-13T04:20:14+5:302021-05-13T04:20:14+5:30
संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप ...

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दहा टक्के बेड आरक्षित ठेवावेत
संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना मागणीचे निवेदन सोमवारी (दि. १०) देण्यात आले. आरोग्य सेवेतील साठ टक्के पदे रिक्त असतानाही कोरोनाच्या संकटात उपलब्ध कर्मचारी अपुऱ्या सोयी, सुविधेत देखील जिवाची पर्वा न करता एका वर्षापासून विना अपेक्षेने यशस्वीपणे खंबीर भूमिका घेऊन सेवा बजावत आहोत. परंतु अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना ऐनवेळी आरोग्यसेवेपासून वंचित राहून बरे वाईट होऊन आरोग्य यंत्रणेचा कणा मोडू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात तसेच उपलब्ध असलेले कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये एकूण बेड पैकी दहा टक्के बेड आरक्षित करावे. तशी माहिती संघटनेला मिळावी. असेही निवेदनात म्हटले आहे.