सरस्वती नदीत कोसळला टेम्पो; दहा प्रवाशी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 15:40 IST2017-09-16T15:38:27+5:302017-09-16T15:40:09+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव-पेडगाव रस्त्यावर असणा-या सरस्वती नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने धाडस करुन टेम्पो पाण्यात घातला़ ...

सरस्वती नदीत कोसळला टेम्पो; दहा प्रवाशी बचावले
श्रीगोंदा : तालुक्यातील शेडगाव-पेडगाव रस्त्यावर असणा-या सरस्वती नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने धाडस करुन टेम्पो पाण्यात घातला़ मात्र, पुराच्या वेगामुळे हा टेम्पो नदीत कोसळला़ दरम्यान टेम्पोतील दहाही प्रवाशांनी प्रसंगावधान राखीत बाजूला उड्या घेत जीव वाचवले़ ही घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
तालुक्यात सर्वत्र धो धो पाऊस पडत आहे. नदी- नाल्याना पूर आला आहे. पेडगाव परिसरात असणा-या सरस्वती पुलावरून शुक्रवार सकाळपासून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. दरम्यान शनिवारी सकाळी काष्टीचा बाजार असल्याने राशीन, भिगवण परिसरातून येणा-या बाजारकरुची मोठी गैरसोय झाली़ राशीन परिसरातील एक पिकअप टेम्पो काष्टी येथे दहा प्रवाशाना घेऊन निघाला होता़ या पिक अपमध्ये काही दुचाकीही होत्या. पिकअप सरस्वती नदीवरील पुलावरून जात असताना चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा वेग जास्त असल्याने टेम्पो प्रवाहासोबत नदीत कोसळला. दरम्यान चालकाने पुरात टेम्पो घालताच प्रवाशांनी धोका ओळखून बाजूला उड्या मारल्या़ त्यामुळे सर्व प्रवाशी बचावले़ परिसरातील नागरिकांनी मदतकार्य करीत हा पिकअप टेम्पो पाण्याबाहेर काढला.