करुले शिवारात टेम्पोचा अपघात; दोघेजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST2021-08-14T04:25:03+5:302021-08-14T04:25:03+5:30

संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने कोपरगावच्या दिशेने महिंद्रा टेम्पो (एमएच १८, एए ६२२५) जात होता. धुळे येथे चाललेल्या महिंद्रा टेम्पोला ...

Tempo accident in Karule Shivara; Both were injured | करुले शिवारात टेम्पोचा अपघात; दोघेजण जखमी

करुले शिवारात टेम्पोचा अपघात; दोघेजण जखमी

संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने कोपरगावच्या दिशेने महिंद्रा टेम्पो (एमएच १८, एए ६२२५) जात होता. धुळे येथे चाललेल्या महिंद्रा टेम्पोला करुले शिवारात समोरून आलेल्या कंटेनरने कट मारल्याने टेम्पो डांबरी रस्त्यावर उलटून अपघात झाला. या अपघाताच्या घटनेत टेम्पोतील सचिन चौधरी (वय ३०) व राम जगन्नाथ मोराणाकर (रा. धुळे) हे दोघेजण जबर जखमी झाले. अपघाताच्या घटनेत टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघात प्रसंगी स्थानिक युवकांनी मदतकार्य केले. अपघातातील जखमींना तातडीने संगमनेर येथील डॉ. शेळके हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी अर्ध्या डांबरी रस्त्यावर उलटलेला टेम्पो बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर अपघातास कारणीभूत ठरलेला अज्ञात कंटेनरचालक वाहन घेऊन पसार झाला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.

Web Title: Tempo accident in Karule Shivara; Both were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.