राहुरीत भरधाव टेम्पोने चिरडले दुचाकीस्वाराला; एक ठार, एक जखमी
By Admin | Updated: May 17, 2017 15:25 IST2017-05-17T15:25:16+5:302017-05-17T15:25:16+5:30
भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने येथील जिजाऊ चौकात दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना चिरडला गेल्याने जागीच ठार झाला़ तर एक जण जखमी झाला़

राहुरीत भरधाव टेम्पोने चिरडले दुचाकीस्वाराला; एक ठार, एक जखमी
आॅनलाईन लोकमत
राहुरी, दि़ १७ - भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने येथील जिजाऊ चौकात दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना चिरडला गेल्याने जागीच ठार झाला़ तर एक जण जखमी झाला़
एस बँकेचे शाखाधिकारी निलेश विद्याधर खारगडे (वय ३०) हे बँकेचे कामकाज आटोपून मोटारसायकलवरून घराकडे चालले होते़ नगरकडे जाणारा आशर टेम्पो (क्ऱ एम़ एच़ १७ ए़ जी़ १६५२) ने खारगडे यांना जोराची धडक दिली़ त्यात खारगडे यांचा जागीच मृत्यू झाला़ सहकारी मित्राला अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले़ जखमीचे नाव समजू शकले नाही़