शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

तेजगड : एक अविस्मरणीय अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 19:37 IST

तेजगड बडोदा शहरापासून ९० किमी अंतरावर असणारे छोटं गांव. इथे पद्मश्री डॉ.गणेश आणि त्यांची पत्नी डॉ.सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात.

सोमेश शिंदे, अहमदनगरतेजगड बडोदा शहरापासून ९० किमी अंतरावर असणारे छोटं गांव.  इथे पद्मश्री डॉ.गणेश आणि त्यांची पत्नी डॉ.सुरेखादेवी 'भाषा' नावाची एक बिनसरकारी संस्था चालवतात. ही संस्था गुजरातमधील आदिवासी क्षेत्रात तेथील बोलीभाषांवर काम करते. अक्षर मानवच्या निमित्ताने तीन दिवस रहायचा योग आला.  भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोलीभाषांचे इथे संवर्धन आणि जतन आॅडिओ आणि पुस्तक स्वरूपात इथे करण्यात आले आहे. भारतातील बोलींवर आणि जिवंत व नष्ट होत चाललेल्या ७८० भाषांवर संशोधन करून लिहिलेला गणेश देवी यांचा पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे आॅफ इंडिया नावाचा ग्रंथ इ.स. २०१०मध्ये प्रसिद्ध झाला. डॉ. गणेश देवी यांना त्यांच्या साहितयातील आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीसाठी इ.स. २०१४ साली पद्मश्री प्रदान झाली. या बहुमोल कामाव्यतिरिक्त त्यांचं आदिवासींच्या उत्थानासाठीचं कार्यही तितकंच अमूल्य व क्रांतदर्शी असंच आहे.गणेश देवींनी इथे आदिवासींची अकादमी स्थापन केलीय. या अकादमीमध्ये भलंमोठं सुसज्ज ग्रंथालय आणि संग्रहालय उभं केलंय.संग्रहालयात आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित वस्तूंचं भांडारच देवींनी मांडून ठेवलंय. केवळ संग्रहालय म्हणून ते उभं केलेलं नसून आदिवासींचं सारं जगणंच त्यातून जिवंत झालेलं पाहायला मिळतं. विविध जंगली पशु-पक्षांचा आणि मोरांचा किलकिलाट, ईकडून-तिकडून बागडणारी वानरे आणि वाघासारख्या श्वापदांचे मुक्तपणे संचार असलेल्या या नयनरम्य वातावरणातील वास्तव्यामध्ये जगातील सर्व भौतिक सुख-सुविधांचा आपोआप विसर पडतो.या तीन दिवसांत गणेश देवींसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. यात अनौपचारिक बातचीत, आणि प्रत्येकाच्या पातळीवर येऊन संवाद साधण्याचं नैसर्गिक साधेपण देवींमध्ये जाणवलं. त्यांच्या पत्नी डॉ.सुरेखा देवी पण सोबत होत्या. या तीन दिवसांच्या संवादातून त्यांच्या व्यग्र दैनंदिनीची कल्पना आली. डॉ.गणेश देवी म्हणतात"आपल्या मातृभाषेखेरीज इतर भाषांकडे जास्त आपुलकीने पाहायला हवे. संवाद वाढायला हवा. सध्या विसंवाद जास्त आहे. सर्व भाषांचे संमेलन व्हायला हवे. भाषा संवादाचे एकमेव साधन आहे. भाषेशिवाय संवाद होऊ शकत नाही. भाषा असेल तर कुटुंब, गाव टिकू शकेल. भाषिक समानता वाढवणे आवश्यक आहे. चित्तविस्तार हे साहित्याचे लक्षण आहे. मराठीवर प्रेम हवेच, पण इतर भाषांवरही प्रेम करता यायला हवे."मराठी भाषेच्या सद्यस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ज्ञानभाषा म्हणून मराठीचा विकास झाला आहे. त्यामुळे मराठीच्या भविष्याबाबत चिंता करण्याचे काहीच कारण नाही. जगात ज्या २५ भाषा राहतील, त्यामध्ये मराठी असेल. मराठीची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीच हातपाय हलवायचे नाहीत. इतर भाषांचा तिरस्कार केल्याने मराठीचा प्रसार होणार नाही. भाषेवर प्रेम केले तरच तिची वाढ होईल.पहिल्याच दिवशी त्यांनी जवळच असलेल्या तेजगडच्या टेकडीवर असलेली गुहा बघून घ्या, असं आम्हाला सुचवलं. मध्य प्रदेशमधलं भीमबेटका यांच्याइतकंच प्राचीन; पण तुलनेनं छोटी गुहाचित्रे या ठिकाणी आहेत. ही गुहाचित्रे बारा हजार वर्षांपूवीर्ची आहेत, हे निश्चित करण्यात आलं ते गणेश देवी यांनी पुढाकार घेऊन पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञांना इथं आणून दाखवल्यावरच! गुहाचित्रांच्या डेटिंगचं काम गणेश देवींनी केलंय, हेही समजलं. हि भित्तीचित्रे तिथल्या एका टेकडीवर आहेत.त्यामुळे एक छोटासा ट्रेकींगचा अनुभव पण घेता आला.दुसर्या दिवशी अकादमी मध्ये एक नाटक सादर करण्यात आले.आदिवासींबरोबरच छारानगर (गांधीनगर) इथल्या कंजारभाट जमातीसाठीही असंच काम देवींनी उभं केलंय. त्यातून ग्रंथालय, कौशल्यविकास आणि संगणक प्रशिक्षणही दिलं जातं. नाटक करू इच्छिणा-या तरुणांना प्रोत्साहन देऊन बुधन हा प्रयोग बसवला गेला. तो राष्ट्रीय पातळीवर गाजला. बुधन हा आदिवासी बंगालमध्ये पोलिसी अत्याचाराला बळी पडला होता हा नाट्य प्रयोग पाहताना आपसूकच दोन आसवं डोळ्यांतून टपकली.देवींच्या कामामुळे गेल्या पाच वर्षांत बचत गटांच्या माध्यमातून इथे सहा कोटी रुपयांची उलाढाल होऊ लागलीय. आदिवासींमध्ये केवळ आत्मभानच आले असे नाही, तर थेट हातात पैसाही आल्याने दागिने सावकाराकडे जायचं काही प्रमाणात थांबलंय.आदिवासींच्या मुलांना शाळेत जायची संधी मिळत नाही. अशा १० ते १२ वयाच्या मुलांना निवडून त्यांना एक वर्ष मातृभाषेतून शिक्षण द्यायचं, नंतर त्यांना गुजरातीतून शिक्षण द्यायचं; ज्याद्वारे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल! हा प्रयोग देवींनी राबवला. तोही त्यांच्या आदिवासी अकादमीद्वारे आश्रमशाळेच्या माध्यमातूनच राबविण्यात येत आहे. गणेश देवी शोषितांना आत्मभान देण्याचं काम करताहेत, त्यांना स्वतंत्र करू पाहताहेत. हे केवळ सामाजिक वा सांस्कृतिक काम नाही, तर दीर्घकालीन राजकीय व्यवस्थाबदलाच्या दिशेने टाकलेले ते पाऊल आहे. म्हणूनच ते महत्त्वाचे आहे!या तीन दिवसांच्या अनुभवाने जगण्याचे एक नवीन भान दिले आहे खूप काही नवीन शिकलो आदिवासी जे की मूळ रहिवासी आहेत त्यांना जवळून पाहता आले .खूप नवीन मित्र मैत्रिणी मिळाले. जुन्याशी अजून वीण घट्ट झाली. अक्षर मानव आणि राजन सरांना त्यासाठी खूप धन्यवाद. समाज समृद्धी साठी त्यांनी उचलले हे पाऊल नक्कीच मोठया समुदायाला मार्गदर्शक ठरेल .

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र