तांत्रिक आणि कार्यात्मक शैलीचा विकास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:29+5:302021-02-25T04:25:29+5:30
महात्मा फुले कृषि विद्यापीठात चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारोप प्रसंगी ...

तांत्रिक आणि कार्यात्मक शैलीचा विकास करावा
महात्मा फुले कृषि विद्यापीठात चार दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेचे संचालक सरवनन राज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु अशोक ढवण होते.
याप्रसंगी अशोक फरांदे, शरद गडाख, प्रमोद रसाळ, मिलिंद अहिरे, सुनिल गोरंटीवार, एम. जी. शिंदे, एम.बी. धादवड, टी. के. देवकर, एम. आर. पाटील, सचिन सदाफळ, डी. एन. फराटे उपस्थित होते.
अशोक ढवण म्हणाले, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी क्षेत्रातील संधींची माहिती होऊन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या संधींचा उपयोग करावा. प्रशिक्षण कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन केल्यास विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल. शरद गडाख म्हणाले, कृषी उच्च शिक्षणाकरीता भारतात विविध शासकीय शिक्षण संस्था कार्यान्वित असून त्यांचे प्रमुख उदिदष्ट शिक्षण, संशोधन आणि विस्तार हे आहे. बदलत्या काळात समाजाची व कृषी उद्योजगताची गरज भागविण्याकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे.