टीम टॉपर्स, वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:26 IST2021-02-17T04:26:44+5:302021-02-17T04:26:44+5:30
स्पर्धेत ७ ते ९ वर्ष वयोगटातील छबी चौधरी प्रथम, दिवांश कांकरिया द्वितीय, तर आदर्श बिश्वास (इनलाईन गट) आला. ...

टीम टॉपर्स, वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंची निवड
स्पर्धेत ७ ते ९ वर्ष वयोगटातील छबी चौधरी प्रथम, दिवांश कांकरिया द्वितीय, तर आदर्श बिश्वास (इनलाईन गट) आला. ९ ते ११ वयोगटात प्रथम- जागृती बागल, द्वितीय कलश शहा, रुद्र निकम (इनलाइन गट), १४ ते १७ वयोगटात प्रथम- अब्दुल वाहिद शाह, चैतन्य गुंदेचा (राखीव), खुला गट प्रथम- गौरव डहाळे, द्वितीय- आवेज शेख यांनी यश मिळवले.
याशिवाय अरहम गुगळे, ओंकार राऊत, ध्रुव भळगट यांनी सहभाग नोंदविला.
सर्व यशस्वी खेळाडूंचे नगरसेवक गणेश भोसले, जिल्हा रोलर स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ शेख, टीम टॉपर्सचे सागर कुकुडवाल, सल्लागार आसिफ शेख, वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक व संचालक सतीश वाकळे पाटील, संदीप वाकळे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
-----------
फोटो - १६स्केटिंग
अहमदनगर जिल्हा संघटना आयोजित जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेत व राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत टिम टॉपर्स स्केटिंग अकॅडमी व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.