उर्दू शाळेतील शिक्षिकेचे युट्यूबद्वारे अध्यापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:16 IST2021-06-26T04:16:11+5:302021-06-26T04:16:11+5:30
कोविड संकटामुळे प्राथमिक शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत असताना त्यांची अभ्यासातील गोडी कायम ठेवण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. ...

उर्दू शाळेतील शिक्षिकेचे युट्यूबद्वारे अध्यापन
कोविड संकटामुळे प्राथमिक शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत असताना त्यांची अभ्यासातील गोडी कायम ठेवण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. त्याकरिता शिक्षिका तरन्नूम खान यांनी युट्यूबचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी त्यांचा सन्मान केला.
ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ऑनलाईन गुगल झूम, गुगल मिट, यु ट्यूब, व्हॉट्सॲप यांचा वापर करण्याचे सरकारचे निर्देश आहेत. त्यामुळे तरन्नूम खान यांनी इयत्ता ६वी ते ८वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर व्हिडिओ निर्मिती केली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते घरी उत्साहाने व्हिडिओ पाहात अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करत आहेत.
युट्यूब चॅनेलद्वारे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले आहेत. उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी आलीम शेख, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण, मुख्याध्यापक जलील शेख यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
-------------
१४५ व्हिडीओ
उर्दू माध्यमातील विविध विषयांवरील पाठ्यक्रमांवर १४५ व्हिडिओंची निर्मिती शिक्षिका खान यांनी केली आहे. त्यांनी ऑनलाईन स्कूल नावाचा त्याकरिता चॅनेल सुरू केला आहे.
----------
फोटो आहे : तरन्नूम खान
-------