कोरोना कुटुंबियांच्या समुपदेशनाचे काम शिक्षकांनी करावे : वाकचौरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:23+5:302021-04-16T04:20:23+5:30

गेल्या वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे . आता तर रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात आणखी नवीन समस्या समोर ...

Teachers should counsel the Corona family: Wakchaure | कोरोना कुटुंबियांच्या समुपदेशनाचे काम शिक्षकांनी करावे : वाकचौरे

कोरोना कुटुंबियांच्या समुपदेशनाचे काम शिक्षकांनी करावे : वाकचौरे

गेल्या वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे . आता तर रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात आणखी नवीन समस्या समोर येत आहे. कोरोना रुग्णाच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ झाली व त्याचा कुटुंबातील लोकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे काही शिक्षकांना समुपदेशन प्रशिक्षण देऊन रुग्णांना व कुटुंबाला मानसिक आधार द्यावा. तशाही वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे हे काम शिक्षकांनी केले तर हा नवीन उपक्रम इतर जिल्ह्यांमध्ये ही राबवला जाईल. म्हणून या विषयाकडे गांभीर्याने पाहावे. शहरात मानसोपचार तज्ज्ञ असतात, पण ग्रामीण भागात ते नसल्याने शिक्षकांनी सगळे नियम पाळून किंवा सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती व समुपदेशन करावे.

तरी यात तातडीने लक्ष घालून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा उपक्रम राबवून राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.

Web Title: Teachers should counsel the Corona family: Wakchaure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.