शिक्षक - शिक्षकेतरांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतनाचा हिशोब त्वरित द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:33+5:302021-07-09T04:14:33+5:30
माध्यमिक विभागाच्या वेतन पथक कार्यालयात लेखाधिकारी गादीकर यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना अजून डीसीपीएस हिशोब ...

शिक्षक - शिक्षकेतरांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतनाचा हिशोब त्वरित द्यावा
माध्यमिक विभागाच्या वेतन पथक कार्यालयात लेखाधिकारी गादीकर यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना अजून डीसीपीएस हिशोब पावत्या मिळालेल्या नाहीत, तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन खाते दोन महिने उघडूनसुद्धा खात्यात आधीची रक्कम व आत्ताची रक्कम आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांनी संघटनेकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची कपात झालेली रक्कम शासन कुठे गुंतवत आहे? ते कसे गुंतवत आहे? व निवृत्तिनंतर ती कशी मिळणार, यासंदर्भात ऑनलाईन किंवा ऑफलाईन कार्यशाळेचे आयोजन करून शिक्षकांना संपूर्ण माहिती देऊन शिक्षकांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे, सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे, सरचिटणीस महेश पाडेकर, शेवगाव तालुकाध्यक्ष मफीज इनामदार, सचिन लगड, श्रीगोंदा महिला अध्यक्ष रूपाली बोरुडे, रुपाली कुरूमकर, कैलास राहणे, कोषाध्यक्ष सुनील साबळे, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, रोहिदास चव्हाण, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, राजेंद्र जाधव, सुदाम दिघे, संभाजी पवार, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, संजय पवार, सुदर्शन ढगे, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, मोहंमद समी शेख, हनुमंत रायकर, श्रीकांत गाडगे, सूर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी आदींनी केली आहे.