शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
2
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
3
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
4
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
5
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
6
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
7
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
8
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
9
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
10
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
11
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
12
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
13
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
15
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
16
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
17
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
18
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
19
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
20
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

राज्यातील शिक्षकांना एका क्लिकवर पाहता येणार पगार पत्रक; बीडच्या शिक्षकाने बनविले ई-सॅलरीबुक अ‍ॅप

By अनिल लगड | Updated: September 5, 2020 12:03 IST

शिक्षकांना मोबाईलवर एका क्लिकवरच आपले पगार पत्रक पहायला मिळणार आहे. हिवरा-पिंपरखेड (ता. आष्टी, जि. बीड) या खेडेगावातील एका शिक्षकाने ई-सॅलरीबुक अ‍ॅप तयार केले आहे. शिक्षक वर्गात हे अ‍ॅप दोन महिन्यातच लोकप्रिय ठरले आहे.

शिक्षक दिन विशेष

अनिल लगड  /  अहमदनगर : शिक्षकांना मोबाईलवर एका क्लिकवरच आपले पगार पत्रक पहायला मिळणार आहे. हिवरा-पिंपरखेड (ता. आष्टी, जि. बीड) या खेडेगावातील एका शिक्षकाने ई-सॅलरीबुक अ‍ॅप तयार केले आहे. शिक्षक वर्गात हे अ‍ॅप दोन महिन्यातच लोकप्रिय ठरले आहे.

चिंचाळा (ता. आष्टी)जिल्हा परिषद शाळेत रत्नाकर किसन चव्हाण हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चव्हाण हे तालुकास्तरावर वेतनसंबंधी कामकाजासाठी शिक्षण विभागाला मदत करतात. काम करत असताना त्यांना असे लक्षात आले की प्रशासनातील सर्वात मोठी आस्थापना शिक्षक संवर्गाची आहे. शिक्षक खेड्यापाड्यात काम करीत असतात. त्यांचे कार्यालयाकडे येणे-जाणे नसते. यामुळे अनेक शिक्षकांना त्यांचे वेतन कसे होते हे माहित नसते. वेतनातून होणा-या शासकीय व अशासकीय कपाती समजत नाहीत. परिणामी वेतनात त्रुटी राहू शकतात. वैयक्तिकरित्या स्वत:चे वेतन स्वत:लाच पहायला मिळावे यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या सूचनेनुसार चव्हाण यांनी सुरक्षित असे ई-सॅलरीबुक अ‍ॅप बनवले आहे.

..या सुविधा आहेत अ‍ॅपमध्येई-सॅलरी बुक अ‍ॅपमध्ये प्रथम देयके तयार करणा-या व्यक्तीने आपल्याकडील वेतनाचा तपशील अपलोड करावा लागतो. अपलोड करण्यासाठी प्रत्येकाला आपला स्वतंत्र यूझर नेम व पासवर्ड तयार करावा लागतो. ते वापरुन वेतन तपशील अपलोड करता येतो. तपशीलात बदल करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असतो. अपलोड करण्याची पध्दतही सोपी आहे. वेतन ही खासगी बाब असल्याने कुणालाही दिसू नये यासाठी अ‍ॅपमध्ये संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. आपण तयार केलेला पासवर्ड वापरुन लॉगइन झाल्यानंतरच आपले पगार पत्रक (पे स्लीप) दिसते. याशिवाय या अ‍ॅपमध्ये शिक्षकांना आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. यात वर्षाअखेर इन्कम टॅक्स विवरण पत्र, माय डायरी, आपल्या काही शंका असल्यास त्या लिहिण्याची सोय आहे. अ‍ॅप सुरक्षित आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

कोरोना लॉकडाऊन काळात शिक्षकांसाठी ई-सॅलरीबुक अ‍ॅप तयार केले आहे. राज्यातील अनेक शिक्षक व वेतन देयके बनवणारे या अ‍ॅपची सुविधा मिळावी, यासाठी संपर्क करीत आहेत. आतापर्यंत २० हजार शिक्षकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. यात काही त्रुटी असतील तर त्याही दूर केल्या जातील.-रत्नाकर चव्हाण, अ‍ॅप बनविणारे शिक्षक, हिवरा, ता. आष्टी, जि. बीड.

कोणताही अधिकारी, कर्मचारी, शिक्षक काम केल्यानंतर त्याचा मिळणारा मोबदला पाहण्यास उत्सुक असतो. त्यामुळे हे ई-सॅलरीबुक अ‍ॅप शिक्षकांच्या दृष्टीने खरोखरच चांगले आहे.  यातून आर्थिक बाबतीत जागरूकता निर्माण झाली आहे. -मुरलीधर देशमुख, सस्ती, ता.पातूर, जि. अकोला-अनिल गुंजकर, किनवट, जि. नांदेड.

ई-सॅलरीबुक अ‍ॅप शिक्षकांसाठी खूप चांगले आहे. सुरक्षित आहे. पगाराबाबत माहिती मिळते. पगारात दुरुस्ती अथवा बदल करावयाचा असल्यास सूचनाही देता येतात. अ‍ॅप लोकप्रिय ठरत आहे. आमच्या तालुक्यात १०० टक्के शिक्षक अ‍ॅपचा वापर करीत आहेत. -भारत शिरसाठ, मालेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर.-अशोक वायकर, धोंडेवाडी, ता.तासगाव, जि.सांगली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षणTeachers Dayशिक्षक दिन