म्हसणे फाटा येथे भरधाव कारने शिक्षक दांपत्यास उडवले, पत्नी जबर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 18:48 IST2018-09-09T18:48:21+5:302018-09-09T18:48:40+5:30
पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे नगर-पुणे महामार्गावर जातेगांव येथून देव दर्शन घेऊन येणार्या शिक्षक दांपत्यास कारने उडवले. यात पत्नी जबर जखमी झाली.

म्हसणे फाटा येथे भरधाव कारने शिक्षक दांपत्यास उडवले, पत्नी जबर जखमी
पळवे : पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे नगर-पुणे महामार्गावर जातेगांव येथून देव दर्शन घेऊन येणार्या शिक्षक दांपत्यास कारने उडवले. यात पत्नी जबर जखमी झाली.
पळवे बुद्रुकचे निवृत शिक्षक केशव भाऊ पळसकर, पत्नी अलका पळसकर हे दोघेही आपल्या दुचाकीवरून जातेगांव येथील भैरवनाथाचे दर्शन घेऊन सुप्याकडे येत असताना म्हसणे फाटा येथे पुण्याहून नगर कडे जाणा-या कारने चालक सतीष विठोबा शिर्के (रा. अहमदनगर) यांनी मागून जोराची धडक दिल्याने पळसकर दांपत्य रस्त्यावर जोरात पडले. मारुती गाडीचालक वेगाने निघून गेला. परिसरातील व्यक्तींनी तातडीने सुपा येथे उपचारासाठी घेऊन गेले. या धडकेत पत्नी अलका हिस डोक्यास जबर मार लागला असुन पुढील उपचारासाठी पुणे येथे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. चालक शिर्के हे सुपा पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. कॉ. वनाजी धामणे वनाजी, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.