शिक्षक सेवानिवृत्त होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST2021-07-01T04:15:23+5:302021-07-01T04:15:23+5:30
रयत शिक्षण संस्थेच्या डी.डी.काचोळे माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक विठ्ठलराव बोरुडे व उपशिक्षक मानवेल सोनवणे यांचे सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात आदिक ...

शिक्षक सेवानिवृत्त होत नाही
रयत शिक्षण संस्थेच्या डी.डी.काचोळे माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक विठ्ठलराव बोरुडे व उपशिक्षक मानवेल सोनवणे यांचे सेवापूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात आदिक बोलत होत्या. ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास स्कूल समिती सदस्या जया जगताप, नगरसेवक राजेंद्र पवार, मुख्याध्यापक दिलीप नाईक उपस्थित होते.
जया जगताप म्हणाल्या, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक यांच्या प्रयत्नामुळे गतवर्षीच्या शिष्यवृत्ती , एसएससी व इतर परीक्षांमध्ये नाव लौकिक मिळवला. सर्व घटकांचे त्यामध्ये योगदान आहे.
मुख्याध्यापक नाईक म्हणाले, सेवानिवृत्त होणारे दोन्ही शिक्षकांनी अतिशय सचोटीने व प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम करुन विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडविले. विद्यालयाचा लौकिक उंचावण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
सेवानिवृत्त होणारे पर्यवेक्षक बोरुडे यांनी विद्यालयाची पिण्याचे पाण्याची व्यवस्था करुन देणार असल्याचे जाहीर केले. तर मानवेल सोनवणे यांनी विद्यालयास प्रिंटर देण्याचे आश्वासन दिले.
------