शिक्षक बँकेच्या कर्जदरात कपात
By Admin | Updated: August 17, 2014 23:33 IST2014-08-17T22:49:15+5:302014-08-17T23:33:13+5:30
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभासद कर्जावरील व्याजदर दीड टक्के कपात करून १ आॅगस्ट पासून ११ टक्के करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन महादेव गांगर्डे यांनी दिली.

शिक्षक बँकेच्या कर्जदरात कपात
अहमदनगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभासद कर्जावरील व्याजदर दीड टक्के कपात करून १ आॅगस्ट पासून ११ टक्के करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन महादेव गांगर्डे यांनी दिली.
बँकेच्या सद्य परिस्थिती बाबत माहिती देतांना त्यांनी स्पष्ट केले की, बँकेकडे ४६८ कोटींच्या ठेवी असून, ३३९ कोटींचे कर्ज येणे आहे. ठेवींमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळेच बँकेचा सी.डी. रेशो हा सातत्याने कमी झाला आहे.सध्या तो ७२.७४ टक्के पर्यंत खाली आणण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. बँकेची चालू ठेव व गुंतवणूक एकूण १७५ कोटी रुपये झालेली आहे. बँकेचे वसूल भागभांडवल २६ कोटी असून, रिझर्व्ह व इतर फंडस् १६ कोटी रुपये आहेत. तसेच बँकेचे खेळते भांडवल ५२८ कोटी आहे. आकडेवारीवरून बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रिझर्व्ह बँकेने सन २०१२-१३ च्या डिव्हीडंड वाटपास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे बँकेने सन २०१२-१३ व सन २०१३-१४ सालचा एकूण डिव्हीडंड रक्कम १ कोटी ८१ लाख रुपये बँकेच्या सभासदांचे खाती १२ आॅगस्टला वर्ग केलेला आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे बँकेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र थोरात यांनी सांगितले.
यापुढेही बँकेचा सी.डी. रेशो हा ७० टक्केच्या आत आल्यानंतर कर्जामध्ये वाढ करण्याचा तसेच बँकेच्या खर्चामध्ये काटकसर करण्याचा व सभासद हिताचे निर्णय घेण्याचा या संचालक मंडळाचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील. सदिच्छा मंडळाच्या ध्येयधोरणानुसार व मार्गदर्शनानेच कारभार सुरू असल्याचे गांगर्डे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)